राज्यात 35 हजार माहिती अधिकाराची अपिले प्रलंबित

पुणे खंडपीठाकडे सर्वाधिक अपिले : जुलै महिन्यात अडीच हजार अपिले दाखल

पुणे – राज्यात माहितीच्या अधिकाराखाली एकूण 35 हजार 397 अपिले प्रलंबित आहेत. यामध्ये पुणे खंडपीठाकडे सर्वाधिक अपिले प्रलंबित असून ही संख्या 8 हजार 746 इतकी आहे.

-Ads-

राज्यात 2005 पासून माहितीचा अधिकार कायदा लागू करण्यात आला. या कायद्यामुळे सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांमधील हवी ती माहिती उपलब्ध मिळू लागली. या माहितीमुळे प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता येऊ लागली. तसेच अनेक गैरप्रकार या माहितीच्या अधिकारामुळे उघडकीस आली आहेत.

संबधित कार्यालयांमधील अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्यास त्याविरूद्ध विभागनिहाय खंडपीठाकडे द्वितीय अपिल दाखल करण्यात येते. खंडपीठाचे माहिती आयुक्त यावर सुनावणी घेऊन आदेश जारी करतात. राज्यात पुणे, कोकण, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, अमरावती आणि बृहन्मुंबई अशी खंडपीठे आहेत. तर, मुख्य माहिती आयुक्त कार्यालय हे मुंबई आहे. या आठही कार्यालयांमध्ये जुलै 2018 अखेरपर्यंत 35 हजार 397 अपिले प्रलंबित आहेत. मुंबई मुख्यालय येथे 6 हजार 239, बृहन्मुंबई येथे 210, कोकण खंडपीठाकडे 2 हजार 879, पुणे खंडपीठाकडे 8 हजार 746, औरंगाबाद येथे 1 हजार, नाशिक येथे 8 हजार 93, नागपूर येथे 723 आणि अमरावती खंडपीठाकडे 7 हजार 505 अपिले प्रलंबित आहेत. तर, राज्यात 2 हजार 917 अपिलांवर निर्णय झालेला आहे. अपिले दाखल करण्याची संख्या वाढत असल्याने त्यावर सुनावणी घेऊन निकाल देण्यासाठी विलंब लागत आहे. जुलै 2018 या एकाच महिन्यात राज्यात 2 हजार 624 अपिले दाखल झाली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)