राज्यात 10 महापालिकेसाठी 21 फेब्रुवारीला मतदान

जिल्हा परिषदेची निवडणूक होणार दोन टप्प्यात
दोन्हीचे निकाल 23 फेब्रुवारीलाच

मुंबई : राज्यात होणाऱ्या 10 महानगरपालिका आणि नागपूर वगळता 25 जिल्हा परिषद निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 21 फेब्रुवारीला दहा महापालिकांसाठी मतदान होणार असून 23 फेब्रुवारीला मतमोजणी होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्‍त जे.एस.सहारिया यांनी दिली आहे. नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीला न्यायलयाची स्थगिती असल्यामुळे या ठिकाणच्या निवडणुका जाहीर करता येणार नसल्याचेही सहारिया यांनी सांगितले.
राज्यातील 25 जिल्हा परिषदांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. 16 फेब्रुवारीला मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार असून यात 15 जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यासाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदांचा निकाल 23 फेब्रुवारीलाच जाहीर होणार आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. दरम्यान, महापालिकांसाठी 19 फेब्रुवारीच्या संध्याकाळी प्रचारबंदी लागू होणार आहे. तसेच प्रत्येक उमेदवाराने स्वतंत्र बॅंक खाते उघडावे आणि निवडूक झाल्यानंतर झालेला सर्व खर्च हा 30 दिवसांच्या आत निवडणूक आयोगाकडे सादर करण्यासही सांगण्यात आले आहे. 21 जानेवारी ते 3 फेब्रुवारीपर्यंत महापालिका उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे. तसेच दहा महापालिकांची 4 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत असणार आहे.
दरम्यान, पारशिवनी आणि वानाडोंगरी हे जिल्हा परिषद मतदार संघ होते. त्यानंतर राज्य सरकारने त्यांना नगरपरिषद, नगरपंचायत म्हणून घोषित केले. या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले. निवडणुकीना सहा महिन्यापेक्षा कमी कालावधी असताना असा सरकारी निर्णय घेता येत नाही असा वाद याचिकाकर्त्याने केला आहे. दरम्यान, हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीतून वगळण्यात आली आहे.

जिल्हा परिषद पहिला टप्पा –
औरंगाबाद, जालना, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, जळगाव, अहमदनगर, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली
जिल्हा परिषद दुसरा टप्पा –
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, गडचिरोली
दहा महापालिका
1. मुंबई
2. पुणे
3. पिंपरी चिंचवड
4. ठाणे
5. उल्हासनगर
6. नाशिक
7. नागपूर
8. अकोला
9. अमरावती
10. सोलापूर

25 जिल्हा परिषद

1. रायगड
2. रत्नागिरी
3. सिंधुदुर्ग
4. पुणे
5. सातारा
6. सांगली
7. सोलापूर
8. कोल्हापूर
9. नाशिक
10. जळगाव
11. अहमदनगर
12. अमरावती
13. बुलढाणा
14. यवतमाळ
15. औरंगाबाद
16. जालना
17. परभणी
18. हिंगोली
19. बीड
20. नांदेड
21. उस्मानाबाद
22. लातूर
23. वर्धा
24. चंद्रपूर
25. गडचिरोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)