राज्यात सेना भाजप युतीची सर्वाधिक बेकायदा होर्डिंग्ज : हायकोर्टात याचिकर्त्यांची माहिती 

शिवसेनेची 47 तर भारतीय जनता पक्षाची 41 बेकायदा होर्डींग 
मुंबई, (प्रतिनिधी): राजकीय पक्षांच्या बेकायदा होर्डिंग्जमुळे शहरे विद्रुप होतात हे उघड उघड सत्य असताना राज्यात बेकायदा होर्डींगमध्ये शिवसेना भाजप युती सरकारनेच आघाडी घेतल्याचे न्यायालयात उघड झाले आहे. याचिकाकर्त्यांनी राज्याच्या पालिकांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार ही सर्व माहिती आज न्यायालात सादर केली.
त्यानुसार राज्यभरात शिवसेनेची 47 तर भारतीय जनता पक्षाची 41 बेकायदा होर्डींग असून मुंबई आणि नगर जिल्ह्यात सर्वाधिक मोठ्या बेकायदा होर्डींग असल्याची माहिती हायकोर्टात दिली. तर मुंबई महापालीकेन सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मुंबई शहरात शिवसेनेचे केवळ एकच होर्डिंग असल्याचा दावा केला आहे.
राज्यातील बेकायदा होर्डिंग बाबत मुंबई उच्च न्यायालयात सुस्वराज्य फाऊंडेशन तसेच भगवानजी रयानी यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती एम एस सोनक यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. या होर्डिंगवर कारवाई करण्याचे आदेश कोर्टाने देवूनही अनेक राजकिय पक्षांनी ही होर्डिंग
काढलेली नाहीत त्यामुळे कोर्टाच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या राजकिय पक्षांची नावे द्या असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांना दिले होते त्यानुसार याचिकाकर्त्यांनी पालीका आणि नगरपालीकांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार राज्यातील बेकायदा होर्डिंगची आणि पक्षांची ही माहिती न्यायालयात
सादर केली. याची दखल घेत न्यायालयाने याचिकेची सुनावणी बुधवार पर्यंत तहकूब ठेवली.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)