राज्यात सर्वाधिक आंतरजातीय विवाह

नवी दिल्ली : जाती भेदाच्या भिंती पुसट करण्यासाठी आंतरजातीय विवाह हे एक महत्त्वपूर्ण माध्यम आहे. सन 2012-13 ते 2016-17 या कालावधीत सर्वाधिक 20 हजार 475  आंतरजातीय विवाह महाराष्ट्रामध्ये झाले आहेत.

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचे नवीन आयुष्य सुलभ व सुकर होण्यासाठी आर्थिक सहाय्यता पुरविली जाते. यामध्ये मुलगा अथवा मुलगी दोघांपैकी एक अनुसूचित जातीचे असणे आवश्यक आहे. ही आर्थिक मदत नागरी हक्कांचे संरक्षण याअंतर्गत प्रदान करण्यात येते.

वर्ष 2012-13 मध्ये महाराष्ट्रात एकूण 4 हजार 682 आंतर जातीय विवाह झालेले आहेत. वर्ष 2013-14 मध्ये 4 हजार 971,  तर 2014-15 या वर्षात 4 हजार 283, वर्ष 2015-16 मध्ये 3405 विवाह तर 2016-17 मध्ये 3 हजार 134 इतके आंतरजातीय विवाह संपन्न झाले आहेत. वर्ष 2012 ते 17 मध्ये एकूण 20 हजार 475 आंतर जातीय विवाह महाराष्ट्रात  झालेले आहेत.

महाराष्ट्रापाठोपाठ केरळ या राज्यात आंतरजातीय विवाह जास्त झाले आहेत. वर्ष 2012-13  मध्ये 2189, वर्ष 2013-14 मध्ये 2184, वर्ष 2015-16 मध्ये 2131, वर्ष 2015-16 मध्ये 1790, वर्ष 2016-17 मध्ये 1466 असे आंतर जातीय विवाह झालेले आहेत. वर्ष 2012 ते 17 मध्ये एकूण 9 हजार 760 आंतर जातीय विवाह झाले आहेत. आंतर-जातीय विवाह झाल्यावर सबंधित नवदांपत्याने त्यांच्या जिल्ह्यातील स्थानिक समाज कल्याण कार्यालयात लग्नाच्या प्रमाणपत्रासह अनुसूचित जातीचे आवश्यक कागदपत्रे सादर केल्यास शासनाकडून निर्धारित केलेला निधी त्यांना दिला जातो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)