राज्यात शिक्षणाचा ‘विनोद’ ; राष्ट्रवादीचे टीकास्त्र

मुंबई: भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून शिक्षणव्यवस्था ढेपाळली आहे. महाराष्ट्रात तर शिक्षणाची परिस्थिती बिकटच झाली आहे. शिक्षण आणि उच्चशिक्षण या दोन्ही आघाड्यांवरचं चित्र वाईटच दिसतंय. पाच वर्षांत राज्यभरात ५६ तंत्रशिक्षण महाविद्यालयांना टाळं लागलंय. एका वृत्तपत्र प्रतिनिधीच्या अर्जावर राज्य सरकारनेच ही माहिती दिली आहे. प्राथमिक शाळांची अवस्थाही दयनीय आहे. शिक्षक आणि विद्यार्थी असे दोघेही भरडले जात आहेत. शिक्षकांना अनेक शिक्षणेतर कामांना जुंपलं जातंय. त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर त्याचा थेट परिणाम होतोय. असे राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे काही वर्षांपासून राज्यात सर्वत्रच वेगवेगळ्या कारणांमुळे महानगरपालिका मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळा बंद करत आहेत. मराठी माध्यमाच्या शाळांबाबत राज्य सरकार आणि महापालिकांचीही भूमिका उदासीन आहे. या शाळा वाचवण्यासाठी सरकार ठोस उपाययोजना करत नाहीत. या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्याही घटतेच आहे. या सगळ्या परिस्थितीत शिक्षणमंत्री म्हणून विनोद तावडे यांची कारकीर्द मात्र वादग्रस्त ठरल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)