म्हैसूर : कर्नाटकातील विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यासर्वात कर्नाटकच्या निवडणुकीत भाजपाने विजय मिळवला तर या राज्यात राहणे मला असुरक्षित वाटेल, अशी भीती प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी व्यक्त केले आहे.
आपल्या राज्यातील भीती व्यक्त करताना प्रकाश राज याविषयी काही घटनांचा उल्लेख यावेळी केला. गुलबर्गा येथे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला. माझ्यावर आणि माझ्या कारवर दगडफेक झाली. अशा परिस्थितीत जर राज्यात भाजपाची सत्ता आली तर मी या राज्यात राहणे असुरक्षित समजेन. तसेच दिवसेंदिवस माझ्या मनातील भीती वाढत जात आहे.” यावेळी भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याच्या कल्पनेलाही प्रकाश राज यांनी विरोध केला. असे करणे म्हणजे कुठल्यातरी कावळ्याला राष्ट्रीय पक्षी बनवण्यासारखे आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. “जर बहुसंख्याक असणे हाच निकष असेल आणि याच आधारावर हिंदुराष्ट्र बनवण्याची मागणी होत असेल तर या देशात मोरांपेक्षा कावळ्यांची संख्या अधिक आहे. त्याआधारावर मोराच्या जागी कावळ्यालाच राष्ट्रीय पक्षी घोषित करा, प्रकाश राज म्हणाले. केवळ बहुसंख्यकतेच्या आधारावर कुठल्याही समुहाला या राष्ट्राचे संपूर्ण प्रतिनिधी मानता येणार नाही, असेही ते म्हणाले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा