राज्यात बारा लाख कोटींची गुंतवणूक

मराठवाड्याला सर्वाधिक फायदा


गुंतवणुकीमुळे अविकसित भागात रोजगाराला चालना


36 लाख 77 हजार 185 जणांना रोजगार होणार उपलब्ध


4 हजार 106 सामंजस्य करार

मुंबई – मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉर्न्व्हजन्स 2018च्या माध्यमातून राज्यात 12 लाख 10 हजार 464 कोटी रुपये गुंतवणुकीचे 4 हजार 106 सामंजस्य करार झाले आहेत. त्या माध्यमातून 36 लाख 77 हजार 185 जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. राज्याच्या अविकसित भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर सुरू असलेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जन 2018 जागतिक गुंतवणूक परिषदेचा समारोप आज झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील, मुख्य सचिव सुमित मल्लिक, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल आदी यावेळी उपस्थित होते.

-Ads-

रिलायन्स उद्योग समूहाबरोबर 60 हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या तसेच राज्य शासन व भारतीय रेल्वे यांच्या समवेत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. “सहभाग’ या वेबपोर्टलचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
मॅग्नेटिक महाराष्ट्राला प्रचंड यश मिळाले आहे. राज्याच्या अविकसित भागात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक झाली आहे. त्याचा फायदा मराठवाड्याला मोठ्या प्रमाणावर होणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या यशस्वीतेविषयी मुख्यमंत्री म्हणाले, एकूण 4 हजार 106 सामंजस्य करार झाले असून त्या माध्यमातून राज्यात 12 लाख 10 हजार 464 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्यामध्ये सर्वात जास्त गुंतवणूक उद्योग क्षेत्रात 5 लाख 48 हजार 166 कोटी एवढी होणार असून गृह निर्माण क्षेत्रात 3 लाख 85 हजार तर ऊर्जा क्षेत्रात 1 लाख 60 हजार 268 कोटी गुंतवणूक होणार आहे.

शासनाच्या विविध पायाभूत प्रकल्पांचे 104 सामंजस्य करार झाले असून त्या माध्यमातून 3 लाख 90 हजार 400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून 2 लाख 6 हजार 266 रोजगार निर्मिती होणार आहे. राज्य शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून संरक्षण आणि हवाई उद्योगासाठी 1 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल म्हणाले, महाराष्ट्राने देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. केंद्र शासनाने 2004 ते 2014 या पाच वर्षात 5 हजार 857 कोटी रुपये रेल्वे विकासासाठी महाराष्ट्रात गुंतविले होते. मात्र, त्यानंतर आतापर्यंत 24 हजार 400 कोटी रुपये महाराष्ट्रासाठी देण्यात आले आहेत.

लातूरमध्ये सुरु होणारा रेल्वे कोच निर्मिती कारखाना अवघ्या एका बैठकीत मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर या प्रकल्पासाठी लागणारी जमिन देखील तातडीने हस्तांतरित करण्यात आली. या गतिमान निर्णयाबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतो. या ठिकाणी निर्माण होणारे मेट्रोचे कोच हे देशातच नव्हे तर जागतिकस्तरावर पाठविण्यात येतील. मेट्रोच्या कोचला 50 टक्के मागणी ही अवघ्या महाराष्ट्रातूनच होते, असेही गोयल यांनी सांगितले.

लातूरमध्ये रेल्वे कोचनिर्मिती कारखाना….
रेल्वेसोबत झालेल्या 600 कोटी रुपयांच्या सामंजस्य करारामुळे लातूर येथे सुमारे 350 एकर जागेवर रेल्वे कोच निर्मिती कारखाना पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात येणार आहे. यामुळे या भागात 15 हजार जणांना थेट रोजगार मिळणार आहे. तर त्याच्या तिप्पट अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. हा प्रकल्प एकूण 2 हजार हेक्‍टर जागेवर तयार करण्यात येत आहे. तेथे मेट्रो कोच निर्मिती होणार आहे. या प्रकल्पामुळे लातूर, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांचे भाग्य उजळणार आहे.

मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जन्स 2018 मधील गुंतवणूक…
गृह निर्माण – 7 प्रस्ताव 3 लाख 85 हजार गुंतवणूक


कृषी – 8 प्रस्ताव 10 हजार 278 कोटी गुंतवणूक


पर्यटन व सांस्कृतिक – 17 प्रस्ताव 3 हजार 716 कोटींची गुंतवणूक


ऊर्जा – 17 प्रस्ताव 1 लाख 60 हजार 268 कोटींची गुंतवणूक


इतर – 408 प्रस्ताव 95 हजार कोटींची गुंतवणूक


कौशल्य विकास – 113 प्रस्तावातून 1 लाख 767 रोजगार निर्मिती


उच्च शिक्षण – 12 प्रस्ताव, 2 हजार 436 कोटी गुंतवणूक


महाआयटी – 8 प्रस्ताव 5 हजार 700 कोटी गुंतवणूक


उद्योग क्षेत्र – 3516 प्रस्ताव, 5 लाख 48 हजार 166 कोटींची गुंतवणूक


असे एकूण 4106 प्रस्तावातून 12 लाख 10 हजार 464 कोटींची गुंतवणूक

 

महत्त्वाचे गृहनिर्माण प्रकल्प
क्रेडाई महाराष्ट्र – 1 लाख कोटी (पाच लाख परवडणारी घरे)


नारेडको – 90 हजार कोटी (3 लाख परवडणारी घरे)


खलिजी कमर्शियल बॅंक अँड भूमी राज – 50 हजार कोटी (2 लाख परवडणारी घरे)


पोद्दार हाऊसिंग – 20 हजार कोटी (1 लाख परवडणारी घरे)


कन्सेप्टच्युअल अॅडव्हायजरी सर्व्हिस – 25 हजार कोटी (1 लाख परवडणारी घरे)

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)