राज्यात पावसासाठी पोषक वातावरण

संग्रहित छायाचित्र

पुणे – अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे थंडी गायब होऊन काही भागत पावसाने हजेरी लावली आहे. ही स्थिती अजून एक ते दोन दिवस राहणार आहे.

अरबी समुद्रात लक्षद्विप बेटाजवळ कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून त्याची तीव्रता कमी होण्याचे संकेत आहेत; पण दुसरीकडे बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याची तीव्रता वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण बदलले आहे. सोमवारी राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, लातूर, परभणी, नांदेड, सिंद्धुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांतील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. कार्तिक एकदशीच्या निमित्ताने पंढरपूरात सोमवारी वारकऱ्यांचा मेळा भरला असताना पहाटेपासून याठिकाणी रिपरिप पावसाने हजेरी लावली आहे.

-Ads-

पुणे शहरात ही तापमानात बदल झाला असून थंडी गायब होऊन पुन्हा उकाडा वाढला आहे. अकरा अंशापर्यत खाली आलेले तापमान हे पंधरा अंशापर्यत वाढले आहे. त्याचबरोबर दिवसभर ढगाळ वातावरण होते. ही स्थिती आणखी दोन दिवस राहणार आहे.

ढगाळ हवामानामुळे किमान तापमान सरासरीच्या वर गेले असून, राज्यातील थंडी गायब झाली आहे. ही स्थिती आणखी दोन दिवस राहणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)