राज्यात पावसाची हजेरी

पुणे – मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला असताना आता राज्यात ही पावसाने जोर धरला आहे. गेले दोन दिवसांपासून राज्यातील मध्य महाराष्ट्र व कोकणातील विविध ठिकाणी चांगला पाऊस पडत आहे. पुण्यात ही संध्याकाळी हलक्‍या पावसाच्या सरी कोसळल्या. दिवसभर मात्र शहरात ढगाळ वातावरण होते.

पावसाचा आता परतीचा प्रवास सुरु झाला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा पावसाची आशा निर्माण झाली आहे. अद्याप हा परतीचा मान्सून महाराष्ट्रात पोहचलेला नाही. त्यापूर्वीच राज्यात विविध भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. ठाणे, रायगड, सिंधूदुर्ग, कोल्हापूर, पुणे, सांगली, औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह काही भागात पाऊस पडला. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्‍यात जोरदार पाऊस झाला. सातारा जिल्ह्यात अनेक भागात दोन दिवासांपासून रोज पाऊस पडत आहे. विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने सातारा शहराला ही झोडपून काढले. पुण्यातही रविवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण होते. पण पावसाने हुलकावणी दिली. काही भागात किरकोळ स्वरुपाचा पाऊस झाला. महिनाभरापासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पाऊस पडत असल्याने पिकांना थोडे जीवदान मिळाले आहे. रब्बीच्या पेरणीसाठी हा पाऊस उपयुक्‍त ठरणार आहे, असे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)