राज्यात पावसाचा जोर कमी, तापमानात वाढ

पुणे – पावसाचा जोर ओसरल्याने राज्यात सर्वत्र उन्हाचा चटका वाढला आहे. बहुतांशी ठिकाणावरील तापमान हे 30 अंशाच्या पुढे गेला आहे. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगली येथील कमाल तापमान तर 34.6 अंशाच्या पुढे गेले आहे. राज्यात कुठेही पावसाला अनुकूलस्थिती नसल्याने तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्येच ऑक्‍टोबर हीट जाणवू लागली आहे.

पावसाने उघडीप दिल्याने सकाळपासून उन्हाचा पारा वाढण्यास सुरूवात होत आहे. दुपारी कमाल तापमानाचा पारा 32 अंश सेल्सिअसपर्यत पोचत आहे. सायंकाळी चारनंतर पारा खाली येऊन सायंकाळी सात वाजेनंतर काही प्रमाणात हवेत गारवा तयार होत आहे. मध्यरात्रीनंतर हवेत चांगलाच गारवा तयार होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे किमान तापमानाचा सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट झाली आहे.

बंगालचा उपसागर ते तमिळनाडू या दरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार होत आहे. हिमालयातून परतीच्या पावसासाठी अनुकूल स्थिती असून लवकरच परतीचा प्रवासास सुरूवात होईल. येत्या रविवारी (ता.16) आणि सोमवारी (ता. 17) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात ढगाळ हवामान होऊन तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)