राज्यात पाच खोऱ्यांचा एकात्मिक जल आराखडा

पुणे – राज्यात गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा व पश्‍चिम वाहिनी खोरे अशी पाच खोरे आहेत. राज्यातील या सर्व खोऱ्यांचा एकात्मिक जल आराखडा तयार करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यासाठी महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (मेरी) महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय कृती गट नेमण्यात आला आहे. राज्याचा जल आराखडा तयार करण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे.

राज्यातील गोदावरी, तापी, कृष्णा, नर्मदा खोऱ्यांतील पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी खोरेनिहाय तसेच एकात्मिक राज्य जल आराखडा तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. कृष्णा खोरे, तापी खोरे, नर्मदा खोरे व पश्‍चिम वाहिनी नदी खोऱ्याचे एकात्मिक जल आराखडे हे एकात्मिक राज्य जल आराखडा -गोदावरी खोरे च्या धर्तीवर तयार करण्याचे काम प्रगती पथावर आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कृष्णा व तापी खोऱ्याचे एकात्मिक राज्य जल आराखडे जानेवारी 2018 अखेरीस तसेच नर्मचा व पश्‍चिम वाहिनी नदी खोऱ्याचे एकात्मिक राज्य जल आराखडे फेब्रुवारी2018 मध्ये पूर्ण करून राज्य जलमंडळ व राज्य जल परिषद यांच्या मान्यतेसह सर्व खोऱ्यांचा एकात्मिक राज्य जल आराखडा 31 मार्च 2018 पर्यंत अंतिम करावे , असेही आदेश शासनाने दिले आहेत. मात्र या मुदतीत हे आराखडे तयार न झाल्याने शासनाने जुलै 2018 पर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानंतर नोव्हेंबर मध्ये झालेल्या मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रारूप एकात्मिक राज्य जल आराखड्यास सुधारणांसह मान्यता देण्यात आली. प्रारूप एकात्मिक राज्य जल आराखडा अंतिम मान्यतेसाठी सादर करणे, राज्य जल परिषदेने काही सुधारणा करण्याच्या सूचना दिल्यास असल्यास त्याप्रमाणे सुधारणा करून आराखडा शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द होईपर्यंत या कृति समितीस शासनाने मुदतवाढ दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)