राज्यात दुष्काळाची घोषण करणार

जळगाव- यंदा राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झाल्याने दुष्काळसदृश्‍य परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणूनच राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन शासकीय यंत्रणेला उपाययोजना करण्याबाबत निर्देश देण्यात येत आहेत. महसूल व कृषी विभागाकडून आम्हाला अहवाल प्राप्त होत आहेत, असे नमूद करताना येत्या ऑक्‍टोबरपर्यंत राज्यात दुष्काळाबाबतची घोषणा केली जाईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जळगावात पत्रकार परिषदेत दिली.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नाम विस्तार आनंद सोहळा व छत्रपती संभाजीराजे बंदिस्त नाट्यगृहाचे लोकार्पण या कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी सवांद साधला.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, राज्यात यंदा कमी पावसामुळे दुष्काळाची परिस्थिती उद्भवली आहे. जळगाव जिल्ह्यात यंदा सरासरीच्या केवळ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण टक्‍क्‍यांनी कमी आहे. जिल्ह्यातील सर्वच प्रमुख प्रकल्पांमध्ये अत्यल्प तर मध्यम प्रकल्पांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे आतापासून उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेता काय उपाययोजना कराव्या लागणार आहेत, याबाबत आढावा बैठकीत संबंधित विभागांना निर्देश दिले आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांचा आढावा घेऊन ऑक्‍टोबरपर्यंत पहिली परिस्थिती पाहून दुष्काळाबाबत घोषणा केली जाणार आहे. त्यानंतर योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाच्या खरेदीसाठी राज्यभरात धान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत, त्या दृष्टीने तयारी झाल्याचेही ते म्हणाले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, खासदार ए. टी. पाटील, आमदार सुरेश भोळे, महापौर सीमा भोळे, उपमहापौर अश्विन सोनवणे, जि.प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जलयुक्त शिवार, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, ग्रामसडक योजना तसेच अन्य योजनांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. मुख्यमत्र्यांची नंतर पोलीस अधिकाऱ्यांसोबतही बैठक झाली. या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था, गुन्ह्यांचा आलेख तसेच पोलिसांच्या निवासस्थान या विषयावरही चर्चा केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)