राज्यात थंडीची लाट कायम; जळगावात 6.4 नोंद

पुणे – राज्यात थंडीची लाट कायम आहे. मराठवाडा, पश्‍चिम विदर्भ आणि कोकणातील काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घसरण झाली आहे. राज्यात बुधवारी सर्वांत कमी तापमानाची नोंद जळगाव येथे 6.4 अंश सेल्सिअस झाली आहे.

उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड हवेमुळे राज्यातील किमान तापमानात काही अंशी घट झाली आहे. येत्या दोन ते तीन दिवस ही स्थिती कायम राहणार आहे. त्यानंतर हळूहळू पारा वाढून यात कमी येणाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मध्य महाराष्ट्रातील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत आठ अंशांपर्यंत घसरण झाली आहे. तर, नागपूर येथे किमान तापमानाची 6.6 अंश सेल्सिअस नोंद झाली आहे. चंद्रपूर, सोलापूर, गोंदिया, परभणी येथील किमान तापमानातही सरासरीच्या तुलनेत सहा अंशापर्यंत घट होऊन किमान तापमान सहा अंशापर्यंत खाली आले आहे. कोकणातही थंडी किंचित वाढली असून पारा एक ते दोन अंशाने घसरला आहे.

पुण्यात 7.9 अंश सेल्सिअस नोंद
पुण्यात किमान तापमानात थोडी वाढ झाली असून बुधवारी 7.9 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी दुपारीही जाणवणारी थंडी काही कमी झाल्याचे जाणवत होते. मात्र, रात्रीच्या वेळी जाणवणारा गारठा कायम आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुणे शहरात येत्या दोन ते तीन दिवसांत किमान तापमानात वाढ होण्याची शक्‍यता वर्तविली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)