राज्यात थंडीची तीव्रता होणार कमी

पुणे – उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड हवेचा प्रवाह कमी झाल्याने राज्यातील किमान तापमानात वाढ होत आहे. राज्यात गारठा कायम राहणार असला तरी थंडीची तीव्रता आगामी काळात कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. गुरुवारी अहमदनगर येथे निचांकी 6.0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर, पुण्यात किमान तापमान 8.4 अंश सेल्सिअस नोंदविले.

उत्तरेकडून जमिनीलगत वाहणाऱ्या शीत लहरींमुळे डिसेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यात थंडीची लाट आली. तापमानात झालेली घट यामुळे महाबळेश्‍वर, बुलढाणा, नगरसह अनेक ठिकाणी दवबिंदू गोठल्याचे दिसून आले. पुण्यात नववर्षाची सुरवात गुलाबी थंडीने झाली, मात्र किमान तापमानात काहीशी वाढ झाली आहे. उत्तर भारतातील राज्यांमध्ये उणे एक अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेल्या तापमानात वाढ होत आहे. बुधवारी मध्य प्रदेशातील खजुराहो येथे सपाट भूभागावरील निचांकी 3.4 अंश सेल्सिअस नोंद झाली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुण्यात आकाश निरभ्र राहणार
पुण्यात किमान तापमानाचा पारा 2.1 अंश सेल्सिअसने कमी झाला. मात्र, कमाल तापमानात 3.2 अंश सेल्सिअसने वाढ होऊन 32.0 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. पुढील चोवीस तास आकाश निरभ्र राहणार असून, किमान तापमान नऊ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)