राज्यात थंडीचा कहर

File Pic

नाशिक मध्ये पारा 7 अंशापर्यत घसरला

पुणे – राज्यात सर्वत्र सध्या थंडीची लाट पसरली असून अनेक ठिकाणी तापमानाचा पारा हा सरासरी पेक्षा एक ते दोन अंश सेल्सिअसने खाली घसरला आहे. राज्यात आज सर्वाधिक कमी तापमान हे नाशिक मध्ये 7.9 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. थंडीची ही लाट आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचे ही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरी या प्रभावी झाल्याने राज्यातील थंडी वाढली आहे. हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या अनेक राज्यांमध्ये सध्या बर्फ पडत आहे. त्याचबरोबर राज्यातील हवामान कोरडे असल्यामुळे या शीत लहरींना कुठलाही अडथळा नाही. विदर्भाच्या काही भागात किमान तापामानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात लक्षणीय घट झाली आहे. कोकण, गोवा आणि मराठवाड्यात सरासरी तापमानात किंचित घट झाली आहे. रात्रीच्या तापमानात तर घट झाली आहेच. त्याचबरोबर दिवसाचे तापमान सुद्धा कमी असल्याने दिवसासुद्धा थंडी जाणवत आहे.

पुण्यातही आज तापमानाचा पारा 9 अंशा पर्यत खाली घसरला होता. दोन दिवसापुर्वीच आठ अंशापर्यत तापमान खाली आले होते. त्यामुळे पुण्यात ही आज दिवसभर चांगला गारठा जाणवत होता. दिवसा सुद्धा उन्हाचे चटके जाणवत नव्हते. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुणे शहरात गुरुवारी किमान तापमानात आणखी घट होणार आहे. हे तापमान आठ अंशापर्यत सुद्धा खाली घसरु शकेल. त्याचबरोबर हवामान सुद्धा कोरडे राहणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)