राज्यात थंडीचा कडाका वाढणार

पुणे – उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहू लागल्याने राज्यात थंडी वाढू लागली आहे. पुढील दोन दिवसांमध्ये थंडी आणखी वाढण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. राज्यात मंगळवारी सर्वात नीचांकी तापमान नगरमध्ये 10.2 अंश नोंदिवले गेले, तर पुण्यातही किमान तापमान हे 12.3 अंशापर्यंत घसरले.

उत्तर भारतातील राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे निरभ्र व कोरड्या हवामानाचा अंदाज असून गारठा वाढण्याची शक्‍यता आहे. मंगळवारी पुण्याचा पारा 12.3 अंशापर्यंत घसरला होता. त्यात आणखी घट होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यातील किमान तापमानाचा पारा 17 अंशांपर्यंत पोहचला होता. पण आता पाच ते सात अंशाने त्यात घट झाली आहे.

विदर्भाच्या तापमानात मोठी घट झाली असून किमान तापमान 11 अंश सेल्सिअसजवळ आल्याने नागपूर आणि गोंदिया गारठले आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या तापमानातही घट होत असून बहुताश ठिकाणी पारा 11 अंशाच्या खाली घसरला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)