राज्यात थंडीचा कडाका वाढला

पुणे – उत्तरेकडील राज्यातील शीत लहरी महाराष्ट्राकडे येत असल्याने राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. राज्यातील बहुतांश भागांतील किमान तापमान गुरुवारी दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते. राज्यात सर्वांत निच्चांकी तापमान अहमदनगर येथे 6.2 अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

हिमालय पर्वत आणि लगतच्या राज्यांमध्ये हिमवृष्टी होत आहे. यामुळे उत्तर आणि वायव्य भारतातील राज्यांमध्ये कडाक्‍याची थंडी पडली आहे. उत्तरेकडून महाराष्ट्राच्या दिशेने येणाऱ्या वाऱ्यामुळे राज्य पुन्हा गारठले आहे. गुरुवारी धुळे, जळगाव, सोलापूर, परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट होती.
पुण्यातही गुरुवारी किमान तापमान 8.8 अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यामुळे रात्री थंडीचा कडाका वाढत आहे. दिवसा मात्र थोडा थंडीचा जोर कमी आहे. गेल्या आठवड्यात तापमानाचा पारा इतका खाली घसरला होता की दिवसा सुद्धा गारठा जाणवत होता.हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार शहरात आगामी काळात किमान तापमानात वाढ होण्याची शक्‍यता आहे.थंडीचा जोर काहीसा कमी होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)