राज्यात गुणवत्ता यादीत मुलींचे प्रमाण अधिक वाढावे

उखळमाळ येथे खासदार सुप्रिया सुळे यांचे प्रतिपादन

रेडा- राज्यात गुणवत्ता यादीत मुलींचे प्रमाण अधिक वाढते आहे. परंतु, आपली मुले देखील मागे पडता कामा नयेत. माझी मुलगी ही मुलापेक्षा जास्त टक्के गुण मिळवते, याचा अनुभव मला घरातच मिळाला आहे. इंदापूर तालुक्‍यातील ग्रामीण भाग असलेल्या उखळमाळ येथून सुरू झालेला गुणवंत विद्यार्थांचा गौरव सोहळा विद्यार्थांना कायम प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इंदापूर तालुक्‍यातील मौजे उखळमाळ येथे युवा उद्योजक राज कुमार यांच्या माध्यमातून तालुक्‍यातील दहावी व बारावी इयत्तेतील परीक्षेत गुणात्मक बाजी मारलेल्या विद्यार्थांचा गौरव खासदार सुळे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी खासदार सुळे बोलत होत्या.

या वेळी आमदार दत्तात्रय भरणे, सभापती आप्पासाहेब जगदाळे, सभापती प्रविण माने, सोनाईचे प्रमुख दशरथ माने, युवा उद्योजक राज कुमार व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संतोष गवळी, अमोल मुळे, संजय धिमधिमे, सुनिल केंगार, किसन राऊत, महेश धिमधिमे, दत्ता काटे, ऍड. भागवत तोरणे, स्वप्निल धिमधिमे, श्रीकांत वाघमारे, भरत गवळी, संजय वंचाळे आदि मान्यवर उपस्थित होते.

खासदार सुळे म्हणाल्या की, आयोजक राजकुमार यांनी चांगल्या पद्धतीने हा उपक्रम सुरू केला आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. परंतु, पुढील वर्षी जेवढे मुले तेवढ्या मुली समान, या गुणवत्तेच्या गौरव कार्यक्रमात दिसल्या पाहिजेत, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, राज कुमार यांनी मनोगत व्यक्त केले तर सुत्रसंचालन अमर बोराटे सर, आस्तिक धुमाळ यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)