राज्यात गळीत हंगाम वेगात

File Photo

आतापर्यंत 385.08 लाख मेट्रीक टन ऊस गाळप


400 लाख क्विटल साखरेचे उत्पादन

पुणे – राज्यात सध्या गळीत हंगाम वेगाने सुरू असून आतापर्यंत 385.08 लाख मेट्रीक टन ऊस गाळप झाले असून 400 लाख क्विटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

राज्यात सध्या गळीत हंगाम वेगात सुरू आहे. एकूण 184 कारखाने सुरू असून त्यातील 99 सहकारी व 85 खासगी कारखान्यांचा समावेश आहे. सर्वाधिक कारखाने हे पुणे विभागात सुरू आहेत. या विभागात 62 कारखाने सुरू आहेत; तर कोल्हापूर विभागात 36 कारखाने सुरू आहेत. त्यानंतर नांदेडमध्ये 32 कारखाने सुरू आहेत. सर्वात कमी अमरावती विभागात सुरू असून याठिकाणी फक्त एकच कारखाना सुरू आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सर्व साखर कारखाने सुरू असले तरी अद्याप शेतकऱ्यांच्या एफआरपीचा प्रश्‍न सुटलेला नाही. ही एफआरपी दोन टप्प्यांत द्यायची की एकरकमी याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस तर कारखान्यांना गेलेला आहे, पण एफआरपीचे पैसे मिळालेले नाहीत, अशी स्थिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)