राज्यात क्षयग्रस्त रुग्णांची होणार आधार नोंदणी

99 डॉटस्‌ची औषधे देण्यावर भर
याचबरोबर, डॉटस्‌ उपचारामध्ये बदल करून रुग्ण लवकरात लवकर बरा करण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी दैनंदिन उपचार पध्दतीचा अवलंब केला जात आहे. याची प्रक्रिया मागील दीड महिन्यांपासून सुरू केली आहे. यासाठी देशातील प्रमुख पाच राज्यांची निवड केली आहे. यात महाराष्ट्र राज्याचा समावेश करून ही उपचार पध्दत राबविली जात आहे. यामध्ये 99 डॉटस्‌ची औषधे देण्यावर भर दिला जात आहे. पूर्वी क्षयरोग्रस्त रुग्णांना डॉटस्‌ची औषधे एक दिवसाआड घेण्यास सांगितले जात होते. यात काहीवेळा रुग्णांकडून औषधे घेण्यात खंड पडतो. यामुळे आजार बळावण्याची शक्‍यता वाढते. तरीही रुग्णांनी क्षयरोग निमुर्लन केंद्रात जाऊन तज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला घेऊन पुढील उपचार पध्दतीचा अवलंब केला पाहिजे, असे सांगितले जात आहे.

नवनीत कांबळे

सहसंचालक डॉ. संजीव कांबळे यांची माहिती : “क्‍युअर रेट’ वाढविण्यावर अधिक भर

पुणे – राज्यातील क्षयरोगग्रस्त रुग्णांना आता मोफत औषध उपचारासह दरमहा लाभ रक्‍कम देण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील क्षयरोग उपचार अर्थात निमुर्लन केंद्राव्दारे प्रत्येक क्षयरोगग्रस्त रुग्णांची आधार नोंदणी करण्यात येणार आहे. ही आधार नोंदणी राज्यात पुढील महिन्यापासून करण्यास सुरूवात केली जाणार आहे, अशी माहिती आरोग्य सेवा विभागाचे सहसंचालक डॉ. संजीव कांबळे यांनी दिली.

राज्यासह देशात क्षयरोग रुग्णांच्या संख्येत अनेक कारणांनी वाढ होत आहे. यातील औषधे नियमित न घेणे, उपचार पध्दतीकडे दुर्लंक्ष करणे आदी बाबींमुळे क्षयरोग बरा होण्याऐवजी अधिक प्रमाणात उग्र बनत आहे. यातच आर्थिक क्षमता नसल्यामुळे औषध-उपचार मोफत देऊनही सकस आहार न घेतल्यामुळे काही रुग्णांची प्रकृती सुधारण्याऐवजी खालावते. यावर उपाय म्हणून शासनाच्यावतीने क्षयरोगग्रस्त रुग्णांना आता लाभ रक्‍कम देण्यात येणार आहे. हा रक्‍कम रुग्णांना थेट मिळावी म्हणून त्यांची आधार नोंदणी करण्यात येणार आहे. ही रक्‍कम दरमहा पाचशे रूपये इतकी देण्यात येणार आहे. तसेच ही रक्‍कम क्षयरोगग्रस्त रुग्णांच्या आधार क्रमांक जोडलेल्या बॅंक खात्यात वर्ग केली जाणार आहे. यासाठी क्षयग्रस्त रुग्णांची आधार नोंदणी करण्यात येणार आहे. यामुळे रुग्णांचा “क्‍युअर रेट’ वाढणार आहे, असेही डॉ. संजीव कांबळे यांनी सांगितले.

क्षयरोग हा बरा होणारा आजार आहे. त्यामुळे रुग्णांनी घाबरून जाऊ नये. क्षयरोगग्रस्त रुग्णांना बरे करण्यासाठी प्राथमिक स्तरावर खासगी डॉक्‍टरांनीही रुग्णाला जवळच्या क्षयरोग निर्मुलन आर्थत मोफत औषध-उपचार केंद्रावर उपचार घेण्याचा सल्ला देऊन सहकार्य करावे. ज्यामुळे रुग्णांचा “क्‍युअर रेट’ वाढला जाईल. तसेच रुग्णांनी औषधे नियमित घेतली पाहिजेत.
– डॉ. संजीव कांबळे, सहसंचालक, आरोग्य सेवा विभाग, महाराष्ट्र शासन.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)