राज्यात किमान तापमानात घसरण

पुणे – उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागांत थंडीची लाट आली आहे. राज्यातील काही भागांत किमान तापमानात पुन्हा घसरण झाली असून पारा दहा अंशांच्या आसपास आला आहे.

उत्तर भारतातील राजस्थान, बिहार, गुजरात, ओडीसा, मध्य प्रदेश या भागांत थंडीचा जोर वाढला आहे. त्याचा परिणाम राज्यातील किमान तापमानावर होत आहे. त्यामुळे पारा सरासरीने पाच अंशांपर्यंत खाली आला आहे. मालेगाव, नाशिक येथील किमान तापमानही दहा अंशांच्या खाली होते. विदर्भातही थंडीचा जोर वाढला आहे. त्यामुळे अकोल्यात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत सहा अंशापर्यंत घट झाली. शुक्रवारी राज्यात सर्वात कमी तापमान नागपूरमध्ये 8.2 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. त्यापाठोपाठ नगर, जळगाव, नांदेड, यवतमाळ येथील किमान तापमानातही सरासरीच्या तुलनेत पाच अंशांनी घट झाली. पुणे शहरातही पारा दहा अंश सेल्सिअसपर्यंत घसरला होता. दोन दिवसांपूर्वी शहराचे किमान तापमान आठ अंशांपर्यंत खाली आले होते, पण आता किमान तापमान दोन अंश सेल्सिअसने वाढले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)