राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज

पुणे – पावसाला पोषक हवामान होत असल्याने शनिवारपासून मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. तर उर्वरित ठिकाणी कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. पहाटेचे तापमान कमी झाल्याने गारठा वाढला आहे. तर दुपारी उन्हाचा चटका वाढून तापमानात वाढ होत आहे.

राज्याच्या हवामानात वेगाने बदल होत आहे. मागील आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसानंतर आता पहाटे गारठा तर दुपारी उन्हाचा चटका अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे दिवस-रात्रीच्या तापमानात घट झाली असून, तापमानातील तफावत वाढली आहे. शनिवारी (दि..23 ) सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये भिरा येथे दिवसाचे तापमान उच्चांकी 38.5 सेल्सिअस अंश, तर पुण्यात रात्रीचे नीचांकी 14. 4 सेल्सिअस अंश तापमानाची नोंद झाली आहे.
राज्यातील कमाल आणि किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात दिवस आणि रात्रीच्या तापमानात जवळपास 16 ते 24 अंशांची तफावत असल्याचे दिसून आले आहे. दोन दिवसांमध्ये विदर्भासह महाराष्ट्राच्या तापमानात वाढ होणार असन्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.
मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 9.5 किलोमीटर उंचीवर पश्‍चिम दिशेकडून वेगवान वारे वाहत आहेत. तर पूर्व भारतात बिहारपासून तमिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)