राज्यात उष्माघाताचे 85 रुग्ण तर एकाचा मृत्यू

पुणे – राज्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने एकूण 85 उष्माघाताचे रुग्ण आढळले आहेत. तर अमरावतीमध्ये एका 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. याव्यतिरिक्‍त औरंगाबाद येथेही अशाच प्रकारे एकाचा मृत्यू झाला असून त्याबाबचा मृत्यूसंशोधन अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही मात्र त्याचाही बळी हा कडाक्‍याच्या उन्हामुळेच गेल्याचा संशय आहे.
अमरावतीमध्ये रहाणाऱ्या लक्ष्मण गणपतराव सोळंके या 32 वर्षीय तरुणाला 16 एप्रिल रोजी उन्हाचा त्रास होत असल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र जिल्हा रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. सुरवातीला त्याला त्याला उष्माघाताचा संशयित म्हणून घोषित केल होते. नंतर तेथील जिल्हा मृत्यूसंशोधन समितीने त्याचा मृत्यू उष्माघातानेच झाला असल्याचे समोर आले. तसेच तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद येथेही एका अशाच प्रकारे संशयित रुग्णांचा उष्माघाताने मृत्यू झाला असल्याची शक्‍यता असल्याची माहिती राज्य साथ रोग अधिकारी डॉ.जितेंद्र डोलारे यांनी दिली.

उन्हाचा सर्वाधिक फटका नागपूर व यवतमाळ या दोन जिल्हयांना बसला आहे. नागपुरमध्ये सर्वाधिक 37 तर यवतमाळमध्ये 16 उष्मघाताचे रुग्ण आढळून आले आहेत. तर त्या खालोखाल नाशिकच्या मालेगाव महापालिका क्षेत्रात 11, लातूर 7, बुलढाणा व जळगाव प्रत्येकी 5, नांदेड 2, कोल्हापूर आणि चंद्रपुर जिल्हयात प्रत्येकी एक असे एकुण 85 उष्माघाताचे रुग्ण आढळून आले आहेत. उष्माघात टाळण्यासाठी उन्हात काम करणे किंवा फिरणे टाळावे, सैल कपडे घालावे, भरपूर पाणी प्यावे अशी माहिती राज्य साथरोग अधिकारी डॉ. जितेंद्र डोलारे (सहसंचालक आरोग्य सेवा, पुणे) यांनी दिली.

-Ads-

उष्माघाताची कारणे
-फार वेळ शेतावर काम करणे
-कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काच कारखान्यात काम करणे
-जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे

लक्षणे
थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी होणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरूत्साही होणे, डोके दुखणे, पोट-यात वेदना होणे, पेटके येणे, अस्वस्थता अथवा बेशुध्दावस्था येणे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)