राज्यात उष्णतेची लाट

मध्य महाराष्ट्रही तापतोय


पर्यटन क्षेत्रालाही उष्णतेच्या झळा

पुणे- दिवसेंदिवस वाढत असलेल्या उन्हामुळे राज्यातील बहुतांश शहरांमधील कमाल तापमान 40 अंशाच्या पुढे गेले आहे. या वाढत्या उकाड्यामुळे अंगाची लाही-लाही होत आहे. येत्या दोन दिवसांत विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्‍यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मागील चार दिवसांपासून मध्य महाराष्ट्रातील पुण्यासह जळगाव, सातारा, सांगली, अहमदनगर, सोलापूर, मालेगाव या शहरातील कमाल तापमानाने चाळिशीचा आकडा ओलांडला आहे. त्यामुळे एप्रिलमध्येच उन्हाचा चटका नकोसा झाला आहे. गुरूवारी (दि. 26) अहमदनगर, जळगाव, सोलापूर, मालेगाव येथील कमाल तापमान 43 अंशापर्यंत नोंदविले गेले. उन्हाचा वाढत्या कडाक्‍यामुळे दुपारी रस्ते ओस पडत आहे.

-Ads-

शिवाय उष्माघाताच्या घटना वाढत आहेत. सध्या शाळांना सुट्ट्या लागल्यामुळे नागरिक बाहेरगावी फिरायला जातात. सातारा, सोलापूर आणि नाशिक या जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमी गर्दी असते. विशेषत: पर्यटक सातारा जिल्ह्यातील पर्यटनाला अधिक पसंती देतात. मात्र, उन्हाचा वाढता कडाक्‍यामुळे दुपारी पर्यटनस्थळावर पर्यटकांची गर्दी कमी दिसत आहे.

चंद्रपूर सर्वांत ‘हॉट’
राज्यात आज सर्वाधिक चंद्रपूर येथे 44.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. तर राज्याच्या उर्वरीत भागात तापमान सरासरीच्या जवळपास होते. येत्या 26 ते 30 एप्रिलदरम्यान विदर्भातील काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्‍यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्‍यता असून, हवामान कोरडे राहील अशी शक्‍यता आहे.

गुरूवारी (दि. 26) काही प्रमुख शहरातील कमाल तापमान
चंद्रपुर 44.2, अकोला 43.5, ब्रह्मपुरी 43.4, मालेगाव, परभणी आणि जळगाव 43, वर्धा 42.5, अहमदनगर आणि अमरावती 42.2, सोलापूर 42.1, यवतमाळ 42, वाशिम 41.8, नागपूर 41.7, बुलढाणा आणि उस्मानाबाद 41, गोंदिया 40.8, लोहगाव 40.4, औरंगाबाद 40, सांगली 39.8, पुणे 39.1, सातारा 38.8, कोल्हापूर 38.4, नाशिक 38.5.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)