राज्यातील 7 किनारी जिल्ह्यांत कौशल्य विकास कार्यक्रम

नवी दिल्ली  – महाराष्ट्रातील 7 जिल्हयांसह देशातील 79 सागरी किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यासाठी आज केंद्रीय जहाज बांधणी मंत्रालय आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयांमध्ये सामंजस्य करार पार पडला.
परिवहन भवन येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नरेंद्रसिंह तोमर यांच्या उपस्थित हा करार झाला. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी राज्यमंत्री मनसुख मांडविया यांच्यासह उभय मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
देशातील सागरी किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांतील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि बंदरे व जहाज बांधणी क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ मिळावे या उद्देशाने केंद्रीय जहाज बांधणी मंत्रालयाच्यावतीने विविध केंद्रीय मंत्रालय आणि विभागांच्या मदतीने कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याच दिशेने महत्वाचे पाऊल म्हणून आज जहाज बांधणी मंत्रालयाचा “सागरमाला प्रकल्प’ आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या “दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या’ माध्यमातून देशातील सागरी किनाऱ्या लगतच्या जिल्ह्यांमध्ये “कौशल्य विकास कार्यक्रम’ राबविण्यासंदर्भात महत्वपूर्ण करार झाला.
महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांना एकूण 720 किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. यामध्ये मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे या जिल्हयांचा समावेश होतो.

मुंबई व रायगड येथे प्राधान्याने कौशल्य विकास कार्यक्रम
मुंबई आणि रायगड या सागरी किनाऱ्या लगतच्या जिल्हयांमध्ये जहाजबांधणी मंत्रालयाने नुकतेच सर्वेक्षण व अभ्यास पूर्ण केला आहे. त्यामुळे या दोन जिल्हयांमध्ये “कौशल्य विकास कार्यक्रम’ प्राधान्याने राबविण्यात येणार आहे.
जहाज बांधणी मंत्रालयाच्यावतीने विविध 23 प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रासह देशातील 5 राज्यांतील 18 जिल्हयांमध्ये या आधी पथदर्शी स्वरूपात कौशल्य विकास कार्यक्रम’ राबविण्यात आला. यात महाराष्ट्रातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि ठाणे जिल्हयांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)