राज्यातील 6 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई – राज्य सरकारने 6 वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. कृषि आयुक्‍त, पुणे एस. एम. केंद्रेकर यांची युवक व क्रीडा आयुक्‍त पुणे या पदावर बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी यवतमाळचे आयुक्‍त सचिंद्र प्रताप सिंग यांची बदली करण्यात आली आहे.

सातारा जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी राजेश देशमुख यांची यवतमाळचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्‍ती करण्यात आली. त्यांच्या जागी मुख्यमंत्री कार्यालयातील उपसचिव के. बी. शिंदे यांची सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी निधी चौधरी यांची मुंबई महानगरपालिकेच्या सहआयुक्‍तपदी बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी मुख्यमंत्रयांचे स्वीय सचिव एम. एम. बोरीकर यांची बदली करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)