राज्यातील 48 पैकी 38 जागांवर कॉंग्रेस-राष्ट्रवादी सहमती 

मुंबई: महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 पैकी 38 जागांवर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात सहमती झाली आहे अशी माहिती एका ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्याने दिली. दोन्ही कॉंग्रेस मध्ये 40 जागांविषयी सहमती झाल्याची माहिती शरद पवार यांनी कालच औरंगाबाद येथे दिली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसने कॉंग्रेसकडे असलेल्या औरंगाबाद, पुणे, यवतमाळ, या जागांवर आपला दावा सांगितला आहे. सन 2014 च्या निवडणुकीत कॉंग्रेसने 27 जागा तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने 21 जागा लढवल्या होत्या. यावेळी 26:22 असा फॉम्युर्ला निश्‍चीत झाला होता.

तथापी राष्ट्रवादी कॉंग्रेसने हातकणंगलेची जागा लढवण्यास नकार दिला आहे. तेथे आमच्याकडे सक्षम उमेदवार नाही असे त्यांनी म्हटले आहे. आता ती जागा कॉंग्रेस लढवणार आहे. दोन्ही पक्षांनी रायगड आणि हिंगोली या जागांची अदलाबदल केली आहे. यावेळी कॉंग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या जागांपैकी हातकणंगले, पालघर आणि अकोला या जागा मित्र पक्षांना सोडल्या जातील असे समजते. त्यामुळे कॉंग्रेस आता 24 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या जागा वाटपाबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये तीन ते चार बैठका झाल्या आहेत. आता केवळ 8 ते 10 जागांबाबत संदिग्धता कायम राहीली असून त्यावर पुढील बैठकीत तोडगा काढून जागा वाटप निश्‍चीत केले जाईल असे या नेत्याने स्पष्ट केले. विधानसभेच्या बाबतीत ज्या पक्षाचे आमदार अधिक त्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद देण्यावरही दोन्ही पक्षांचे नेते राजी झाले आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)