राज्यातील 45 साखर कारखान्यांची धुराडी बंद

संग्रहित छायाचित्र....

पुणे- राज्यातील उस गाळप हंगामाच्या अंतिम टप्प्यात सुरूवात झाली आहे. सध्या 186 पैकी 45 साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. या कार्यक्षेत्रातील ऊस गळीत हंगाम संपला आहे. तर आत्तापर्यत 892 लाख टन ऊस गाळप पूर्ण होऊन 994 लाख टन साखरचे उत्पादन झाल्याची माहिती साखर आयुक्‍तालयाकडून देण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 13 आणि सोलापूर जिल्ह्यातील सात कारखान्यांचा गाळप हंगाम आत्तापर्यत बंद झालेला आहे. मंत्री समितीच्या बैठकीनुसार राज्यात सुमारे 649 लाख टन ऊस गाळप पूर्ण होऊन राज्यात साखरचे 63.50 लाख टन साखर उत्पादन तयार होण्याची हंगामाच्या सुरवातीलाच अपेक्षा होती. मात्र, यंदा परतीच्या पावसाने दिलासा दिल्याने ऊस उत्पादनात वाढ झाली. ही वाढ प्रति हेक्‍टरी 80 वरुन 94 ते 97 टनापर्यत वाढली आहे.

काही ठिकाणी 105 ते 110 टनापर्यत उत्पादकता हाती आलेली आहे. त्यामुळे अपेक्षेपेक्षा अधिक ऊस उपलब्धता झाला आहे. राज्यातील कारखान्यांची विभागनिहाय स्थिती पाहता ऊस संपल्याने कोल्हापूर विभागातील पुणे- 15, अहमदनगर- 8, औरंगाबाद- 1, नांदेड- 5, अमरावती- 7, नागपूर- 1 हे कारखाने बंद झालेले आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्व म्हणजे 17 कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)