राज्यातील 250 महसुली मंडळातही दुष्काळ जाहीर – मुख्यमंत्र्यांची घोषणा 

मुंबई: राज्यातील 26 जिल्ह्यातल्या 151 तालुक्‍यांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती असल्याचे राज्य सरकारने बुधवारी जाहिर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 250 महसुली मंडळांत दुष्काळ घोषित केला. या व्यतिरिक्त इतर कोणते मंडळ राहिले असल्यास त्यांच्यातीलही निकष पूर्ण करत असलेल्यांचा यात समावेश होईल. त्याबाबत विचार करण्यासाठी समितीही नेमण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना 250 महसुली मंडळांत दुष्काळ जाहीर घोषित करत असल्याचे सांगितले. पालकमंत्र्यांचे पाहणी दौरे व जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या अहवालानंतर राज्यातील 26 जिल्ह्यातल्या 151 तालुक्‍यांमध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. यातील 112 तालुक्‍यांमध्ये गंभीर स्वरुपाचा, तर 39 तालुक्‍यांत मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मराठवाड्याची स्थिती अधिक गंभीर असून तब्बल 51 दुष्काळी तालुके या विभागातील आहेत. या नंतर आता 250 महसुली मंडळांत देखील दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

सर्व ठिकाणी दुष्काळी उपाययोजना सुरूही करण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्तही जर काही ठिकाणी जर तांत्रिक बाबींची पूर्तता न झाल्याने दुष्काळ जाहीर झालेला नसेल तर या संदर्भात समिती नेमण्यात आली आहे. या समितीकडे तक्रारी किंवा निवेदने सादर करता येउ शकतील. त्यांची तपासणी करून जे निकषात बसत असतील अशा ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

बोंडअळीचा 640 कोटींचा हप्ता दिला 

बोंडअळीच्या नुकसानीसंदर्भात शेतकछयांना दोन हप्ते आधीच देण्यात आले होते.आता देखील शेवटचा 640 कोटींचा हप्ता देण्यात आला असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)