राज्यातील 20 हजार गावांत आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी

नॅशनल सेंटर फॉर क्रॉप फोरकास्टिंग संस्थेच्या सर्व्हेक्षणातील माहिती

पुणे – पावसाचे प्रमाण घटल्याने यंदा राज्यातील 20 हजार गावांमध्ये पिकांची आणेवारी सरासरी पन्नास पैशापेक्षा कमी असून दोनशे तालूक्‍यांवर दुष्काळाचे सावट असल्याचे, नॅशनल सेंटर फॉर क्रॉप फोरकास्टिंग या संस्थेतर्फे केलल्या सर्व्हेक्षणात आढळून आले आहे.

राज्यशासनाच्यावतीने हा सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व्हेनुसार विशेषत; मराठवाड्यात अत्यल्प पाऊस झाल्याने मराठवाड्यातील आठ हजार 525 गावांपैकी 3 हजार 577 म्हणजे 42 टक्के गावांची आणेवारी पन्नास पैशा पेक्षा कमी आहे.त्याचबरोबर मराठवाड्यात जलयुक्त शिवाराची कामे मोठ्या प्रमाणावर होऊन ही त्या भागात पाऊस नझाल्याने जलयुक्त शिवारात पाणी जमी होऊ शकलेले नाही त्याभागात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे, सुमारे 250 तालूक्‍यातील जलपातळी एक ते तीन मीटर पर्यत घटली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यामुळे दुष्काळी भागात तातडीने उपाययोजना राबविण्यासाठी काही पावले उचलणे गरजेचे असल्याचे ही या सर्व्हेक्षणात स्पष्ट करण्यात आले आहे, यंदा दुष्काळामुळे अनेक भागात रब्बीचे पेर होणार नसल्याने व पाऊस नसल्यामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे, अशा परिस्थिती मध्ये सरसकट हेक्‍टरी पन्नास हजार रुपये तर फळबागांच्या नुकसानी पोटी हेक्‍टरी 1 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे. यापार्श्‍वभूमीवर सध्या सुरु असणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा मांडण्यात येणार असून त्यानुसार शेतकऱ्यांना मदतीचे पॅकेज जाहीर होण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)