राज्यातील 106 शिक्षकांचा साताऱ्यात गौरव

आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा : कुटुंबियांसह हजेरी; अनेक मान्यवरांनी मारली दांडी
सातारा, दि. 5 (प्रतिनिधी) –
शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे राज्य शिक्षण पुरस्कार प्रदान समारंभ सातारा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात पार पडला. या सोहळ्याला पुरस्कार प्राप्त शिक्षक-शिक्षिकांचे कुटुंबियही मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाने ऑनलाईन पध्दतीने या पुरस्कारांसाठी निवड केल्याने हे काम पारदर्शकरित्या झाले आहे, अशी भावना पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी व्यक्त केली.
या सोहळ्यासाठी शालेय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मोहनराव कदम, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) गंगाधर म्हमाणे, शिक्षण संचालक (प्राथमिक) सुनील चौहान, विभागीय शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग किरण लोहार, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती राजेश पवार, अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, सिध्दीविनायक ट्रस्ट मुंबईचे अध्यक्ष अभिनेते आदेश बांदेकर, पुष्कर श्रोत्री, भरत जाधव यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
या सोहळ्याचे नेटके नियोजन करण्यात आले होते. सभागृहाबाहेर रांगोळी काढण्यात आली होती. पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या डोक्‍याला फेटे बांधलेले होते. सुरुवातीलाच मंत्री विनोद तावडे यांनी उपस्थित शिक्षकांशी संवाद साधला. शिक्षकांनी केलेल्या उपक्रमांची माहितीही तावडे यांनी व्यासपीठावर जाण्याआधी प्रेक्षकांत मिसळून घेतली.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सोहळ्यासाठी येऊ शकले नाहीत. मात्र यावेळी त्यांचा शुभसंदेश असलेली ध्वनिचित्रफित उपस्थितांना दाखविण्यात आली. अध्यापन आणि अध्ययन या दोन्ही बाबी तंत्रस्नेही असतील तर चमत्कार घडू शकतात. आपले शिक्षक अत्यंत उत्तम पध्दतीने ज्ञानदानाचे काम करत आहेत, असे गौरवोदगार यावेळी मुख्यमंत्र्यांनी काढले. यावेळी पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा परिचय असणाजया पुस्तिकेचे प्रकाश मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कलाकारांचा शालेय जीवनावर उजाळा
या सोहळ्याला उपस्थित असणारे अभिनेते आदेश बांदेकर, पुष्कर श्रोत्री व भरत जाधव यांनी आपल्या शालेय जीवनाला उजाळा दिला. शिक्षण मंत्र्यांच्या संकल्पनेतून या तिघांच्याही गप्पांचा कार्यक्रम यावेळी झाला. या तिन्ही कलाकारांनी आपापल्या शालेय जीवनाविषयीचे प्रश्न एकमेकांना विचारले. आज आम्ही जे काही आहोत, त्यामध्ये पहिली ते दहावी या शालेय शिक्षण काळात शिक्षकांनी दिलेल्या संस्कारांमुळेच आहोत, असे या कलाकारांनी स्पष्ट केले. मराठी शाळा कशा पध्दतीने चांगल्या आहेत, याविषयीच कलाकारांनी भरभरुन सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)