राज्यातील १५ शहरांना केंद्र सरकारचे गिफ्ट; केली ‘इतकी’ घरे मंजूर

नवी दिल्ली : प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत केंद्र सरकारने महाराष्ट्राला मोठे गिफ्ट दिले आहे. यात महाराष्ट्रातील १५ शहरांतील गरिबांसाठी आणखी १० हजार ६३९ घरे मंजूर झाली आहेत. तर, देशात एकूण ३ लाख २१ हजार ५६७ घरे मंजूर करण्यात आली आहेत. यात राज्यातील पुणे शहर, बार्शी (सोलापूर), कोल्हापूर, त्र्यंबक (नाशिक), यावल (नाशिक), सिन्नर (नाशिक), जामनेर (अहमदनगर), बुलडाणा शहर, वरूड (अमरावती जिल्हा), अमळनेर (जळगाव), चोपडा (जळगाव), मनमाड (नाशिक), लोहा (नांदेड), धर्माबाद (नांदेड) आणि पंढरपूर (सोलापूर) या शहरांमध्ये वर्ष २०१७-१८ साठी एकूण १० हजार ६३९ घरे मंजूर झाली आहेत.

केंद्रीय गृह निर्माण व नगर विकास मंत्रालयाच्या केंद्रीय मंजुरी व देखरेख समितीच्या ३२ व्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील १५ शहरातील गरिबांसाठी ८६३ कोटींची गुंतवणूक आणि १५६ कोटींच्या सहाय्यासह १० हजार ६३९ घरे मंजूर करण्यात आली आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)