राज्यातील सर्व आकाशवाणी केंद्रावरुन होणार प्रसारण

सातारा – माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलास कार्यक्रमात “सातारा जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानातील उत्कृष्ट काम, जिल्ह्याची स्वच्छतेत राष्ट्रीय स्तरावर भरारी या विषयांवर सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शुक्रवार दि.26 आणि शनिवार दि.27 ऑक्‍टोबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका पुनम चांदोरकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

देशात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण-2018 स्पर्धेत सातारा जिल्हा प्रथम, जलयुक्त शिवार अभियानाचे सर्वोत्कृष्ट काम, धरणांचे पुनर्वसन, ग्रामीण व शहरी रोजगार हमी योजना, सातबारा डिजीटलायजेशन, मुद्रा योजना, पंतप्रधान कृषी सिंचन योजना व प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी, शालेय विद्यार्थ्यांकडून बीज रोपणाची मोहीम, पुस्तकांचे गाव भिलार तसेच जिल्ह्याच्या एकूण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेबाबतची माहिती श्रीमती सिंघल यांनी दिलखुलास कार्यक्रमातुन दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)