राज्यातील शाळांनी टाकली कात

45 हजारहून अधिक शाळा प्रगत, 61 हजारहून अधिक शाळा डिजिटल


3 हजारहून अधिक शाळा आयएसओ 9000 प्रमाणित

मुंबई : शालेय मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अतंर्गत राज्यातील शाळांनी कात टाकली आहे. या कार्यक्रमातंर्गत राज्यातील 45 हजारहून अधिक शाळा प्रगत, 61 हजारहून अधिक डिजिटल तर 3 हजारहून अधिक शाळा आयएसओ 9000 प्रमाणित शाळा झाल्या आहेत.

महाराष्ट्राचा शैक्षणिक वारसा कायम पुढे राहावा, त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन राज्यातील शैक्षणिक सुविध जागतिक दर्जाच्या व्हाव्यात, यासाठी राज्याच्या शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम म्हणजे शिक्षणाच्या नवीन क्रांतीची सुरुवात आहे. प्रत्येक मूल शिकले पाहिजे, या हेतूने शिक्षण संचालनालयामार्फत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया पक्का व्हावा हाच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

एकही मूल शैक्षणिकदृष्ट्‌या अपेक्षेपेक्षा कमी असणार नाही यासाठी मुलांमधील मुलभूत क्षमाता ओळखून प्रत्येक विद्यार्थ्याने वयोगटानुरुप अपेक्षित शैक्षणिक क्षमता संपादित केली आहे किंवा नाही याची पडताळणी करण्याकरिता प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. याकरिता इयत्ता पहिली ते इयत्त आठवीच्या विद्यार्थ्यांच्या तीन शैक्षणिक प्रगमी चाचण्या घेण्यात येतात. ज्यामध्ये एक पायाभूत चाचणी व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनामधील संकलित मूल्यमापनाच्या दोन चाचण्या घेण्यात येतात. या चाचण्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यामार्फत घेण्यात येतात. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडून शिक्षकांना आवश्‍यकतेनुसार व मागणीनुसार प्रशिक्षण देण्यात येत आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमामुळे शैक्षणिक परिवर्तन होत आहे. शिक्षकांना आपले काम करण्यासाठी अधिक स्वातंत्र्य या कार्यक्रमाअंतर्गत देण्यात आले आहे. राज्यातील प्रत्येक मूल प्रगत झाले पाहिजे, प्रगत होत जाणारे प्रत्येक मूल अप्रत्यक्षपणे राज्य आणि देशालाही विकसित आणि मजबूत बनवणार आहे आणि मुले प्रगत झाल्यास शिक्षक म्हणून सर्वार्थाने ते आपल्या सर्वांचेच यश असणार आहे. आणि प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत हाच संदेश शिक्षकांपर्यंत प्रभावी पद्धतीने पोहोचवण्यात येत आहे.

शिक्षकांना सतत प्रेरणा आणि प्रोत्साहन देणे, त्यांच्या चांगल्या कामाचे आवर्जून कौतुक करणे ही नवीन पद्धत “प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ कार्यक्रमाने रुढ केली आहे. प्रत्येक मूल शिकावे आणि शाळा प्रगत व्हावी, हे या “प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ कार्यक्रमाचे ध्येय आहे, हे ध्येय कसे गाठायचे याचे स्वातंत्र्य अर्थातच शिक्षकांना देण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)