राज्यातील रेशनिंग वाटप 1 एप्रिलपासून बंद?

मुंबई- राज्यातील स्वस्त धान्य व केरोसीन दुकानदार संघटनांनी 1 एप्रिलपासून माल न भरण्याचा व माल वितरीत न करण्याचा निर्णय घेतल्याने राज्याची रेशनिंग व्यवस्था ठप्प पडणार असल्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 1 एप्रिलला जर रेशनिंग व्यवस्था ठप्प पडली तर राज्यात हाहाकार माजेल, असा इशारा माजी अन्न नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.

आघाडी सरकारच्या काळात अत्यंत चोखप्रकारे राज्यातील लाभार्थी रेशन ग्राहाकांना स्वस्त धान्य दुकानांमार्फत स्वस्त अन्न धान्याचे वाटप करण्यात येत होते. मात्र भाजप युतीचे सरकार महाराष्ट्रात येताच अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या अनेक योजना तात्काळ बंद करण्यात आल्या. त्यात आघाडी सरकारच्या काळातील एपीएल कार्डधारकांना दिले जाणारे धान्य बंद करण्यात आले. रेशनवर मिळणारी साखर बंद करण्यात आली. अंत्योदयचा धान्य कोटा कमी केला. तसेच टप्याटप्याने गोरगरिबांना दैनंदिन चूल पेटविण्याकरीता आवश्‍यक असणारे केरोसीनसुध्दा भाजप सरकार टप्याटप्याने बंद करीत आहे. अशाप्रकारे गोरगरिबांच्या तोंडचा घासच या सरकारने हिसकावला आहे, असे ते म्हणाले.

आतातर राज्यातील स्वस्त धान्य व केरोसीन दुकानदार संघटनांनी 1 एप्रिलपासून माल न भरण्याचा व माल वितरीत न करण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील गोरगरीब रेशनकार्ड धारकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे या निर्णयाबाबतीत भाजप सरकारने त्यांच्या बरोबर चर्चा करून त्यांच्या न्याय मागण्या मान्य करून त्वरीत तोडगा काढणे गरजेचे आहे. अन्यथा 1 एप्रिलपासून रेशनकार्ड धारकांना स्वस्त धान्य दुकानातून अन्न धान्य मिळाले नाहीतर राज्यात हाहाकार माजेल, असे देशमुख यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)