राज्यातील बहुतांश भागात तापमानात वाढ

पुणे – पुण्यासह राज्यातील बहुतांश भागातील तापमानात वाढ होत असून परिणामी उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे.पुणे शहरात आज सुद्धा तापमान 38 अंश सेल्सिअस नोंदविले गेले.तापमानाचा पारा असाच वाढत राहीला तर मार्च अखेर पर्यत चाळीशीपर्यत तापमान पोहचेल.असा अंदाज आहे.

राज्यात सध्या सगळीकडेच तापमानाचा पारा वाढला आहे.विदर्भात काल मात्र काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली,उर्वरित महाराष्ट्रात मात्र हवामान कोरडे असल्यामुळे तापमान वाढ झाली आहे.राज्यात सर्वाधिक तापमान हे परभणी येथे 40.4 अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

पुणे शहरात ही मार्च महिना संपत असताना उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. काल (बुधवारी) तापमान 38 अंश सेल्सियसवर गेले होते. मात्र, आता शनिवार आणि रविवार तापमानाचा पार आणखीनच चढण्याची शक्‍यता आहे. या दोन दिवसांत तापमान 39 अंश सेल्सिअसवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच सोमवारी हे तापमान चाळीशी ओलांडून 41 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)