राज्यातील पाऊस ओसरण्याची शक्‍यता

संग्रहित छायाचित्र

पुणे – पूर्व भारतातील कमी दाबाचे क्षेत्र विरून गेल्याने राज्यातील पाऊस ओसरण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या भटिंडापासून बंगालच्या उपसागरात सक्रिय आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. 1 सप्टेंबर मध्ये बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहे. त्यानंतर राज्यात पावसाचे प्रमाण वाढू शकते. सध्या महाराष्ट्रामध्ये समुद्र सपाटीपासून 3.6 ते 5.8 किलोमीटर उंचीवर वाऱ्याचे पूर्व-पश्‍चिम जोडक्षेत्र असल्याने काही भागांत गुरुवारी पावसाची शक्‍यता आहे; पण एकंदरीत यापुढील काळात पावसाचा जोर हा राज्यात कमी होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, पावसाचा जोर घाट माथ्यावरही कमी झाल्याने जिल्ह्यातील बहुतांशी धरणांमधील विसर्ग थांबविण्यात आला आहे. सध्या खडकवासला धरणातून 856 क्‍युसेक पाणी सोडण्यात येत आहे. उर्वरित धरणांमधील विसर्ग बंद करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)