राज्यातील दोन शिक्षिकांना सीबीएससी शिक्षक पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली:  मुंबईच्या आर.एन.पोतदार हायस्कूलच्या शिक्षिका पूजा भसीन आणि रूपिंदर कौर साहनी यांना उत्कृष्ट कार्यासाठी आज केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांच्या हस्ते सीबीएससी शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

येथील वसंतकुंज इन्स्टिट्यूशनल परिसरातील  ‘शौर्य’ सीआरपीएफ ऑफिसर्स इन्स्टिट्यूट येथे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने ‘सीबीएससी शिक्षक पुरस्कार २०१७-१८’ च्या वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री. कुशवाह यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्यासाठी देशभरातील 37 शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सचिव रिना राय यावेळी उपस्थित होत्या.

मुंबईच्या सांताक्रुज भागातील आर.एन.पोतदार हायस्कूलच्या शिक्षिका पूजा भसीन आणि रूपिंदर कौर साहनी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. 50 हजार रूपये, प्रशस्तिपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

पूजा भसीन यांनी परंपरागत पद्धतीसोबतच आधुनिक पद्धतीचा प्रभावी उपयोग करून विद्यार्थ्यांना गणित हा विषय सोपा करून शिकवतात. ट्विटर, फेसबुक, फ्लिप्ड लर्निंग नेटवर्क आदिंचा प्रभावी उपयोग करून विद्यार्थ्यांच्या ज्ञान कक्षा विस्तारित करण्याचे कार्य त्या करीत आहेत. त्यांनी फ्लिफ्ड वर्ग घेत विद्यार्थ्यांमधील विविध गुणांना हेरून शिक्षण देण्याची पध्दती विकसित केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून गुणवत्तेला उजाळा देण्यासाठी त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची नोंद घेऊन त्यांचा आज सन्मान करण्यात आला.

रूपिंदर कौर साहनी या प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांची आवश्यकता व आवडीनुसार गुगल वर्ग, एडपजल, काहूट, क्विजलाइज, गो कॉनरैंड फ्लिप्ड व्हिडिओ आदी आधुनिक माध्यमांचा उपयोग करून विद्यार्थीस्नेही शिक्षण देण्याचे कार्य त्या करीत आहेत. विविध विषयांचे प्रभावी सादरीकरण, कथा वाचन आदी उपक्रमांसाठी त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असतात श्रीमती साहनी यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)