राज्यातील थंडीत चढ-उतार

पुणे – छत्तीसगडचा दक्षिण भाग, तेलंगणा आणि विदर्भात असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा उत्तरेकडील थंड वाऱ्याला अडथळा येत आहे. यामुळे राज्यातील थंडीत चढउतार होत आहे.काही भागात ढगाळ वातावरण होते तर गार वारे सुद्धा वाहत होते. राज्यातील अनेक भागांत गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने जम बसविला आहे. थंडी अजून काही दिवस अशीच राहणार आहे. या थंडीमुळे मध्य महाराष्ट्रातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. बंगालच्या उपसागरात दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. तसेच, कर्नाटकाचा उत्तर भाग व परिसरात समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे विदर्भात वाहत असलेल्या थंड वाऱ्याला अडथळा तयार होत आहे. त्यामुळे विदर्भातील बहुतांशी भागात ढगाळ हवामान असून, थंडी कमी झाली आहे. परिणामी, किमान तापमानात किचिंत वाढ झाली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, कोकणातील बहुतांशी भागात हवामान कोरडे राहणार आहे.यामुळे थंडी कायम राहणार आहे.पुढील चोवीस तासात राज्यातील विविध भागात किमान तापमान सरासरीच्या एक ते दोन अंशाने कमी राहणार आहे.

पुणे शहरात आज तापमान 12 अंशापर्यत नोंदविण्यात आले असले तरी गार वारे वाहत असल्यामुळे गारठा जाणवत आहे. कमाल तापमानात सुद्धा घट झाल्याने दिवसासुद्धा गारठा जाणवित होता.रात्रीच्या काळात तर हे प्रमाण अधिक होते


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)