राज्यातील आठ तालुक्यात दुष्काळ जाहीर

File photo

मुंबई : 2017-18 च्या रब्बी हंगामासाठी राज्याच्या यवतमाळ, जळगाव आणि वाशिम या तीन जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळ जारी केलेल्या तालुक्यांमध्ये विविध उपाययोजना लागू करण्याचा विचार सरकार करत आहे.

यवतमाळ मधील राळेगाव, दिग्रस, घाटंजी, केळापूर आणि यवतमाळ, वाशिम जिल्ह्यातील वाशिम आणि जळगावमधील मुक्ताईनगर आणि बोदवड तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे जून ते सप्टेंबर 2017 या कालावधीमध्ये कमी झालेला पाऊस तसंच भूजल पातळीत झालेली घट, पाण्याची उपलब्धतता, पेरणीखालील क्षेत्र आणि पिकांची उपलब्धता या सर्व गोष्टींचा विचार करुन, प्रभावित झालेल्या तालुक्यामध्ये आपत्तीची शक्यता विचारात घेऊन, राज्यातील आठ तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)