राज्यातील अंगणवाड्यांमध्ये फुलणार परसबागा

कुपोषण निर्मुलनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल : 7 लाख 50 हजार विद्यार्थ्यांना मिळणार लाभ


रिलायन्स फाउंडेशन आणि महिला-बालविकास विभाग यांच्यामध्ये सामंजस्य करार

मुंबई – कुपोषण निर्मुलन करण्याच्या दृष्टीने राज्यातील अंगणवाड्यांमध्ये परसबागा निर्माण करण्याचा कार्यक्रम रिलायन्स फाउंडेशन आणि महिला – बालविकास विभाग यांच्यामार्फत हाती घेण्यात आला आहे. राज्यातील 16 जिल्ह्यांमधील अंगणवाड्यांमध्ये 25 हजारहून अधिक परसबागा तयार करण्याच्या दृष्टीने आज मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रिलायन्स फाउंडेशन आणि महिला – बालविकास विभाग यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. राज्य शासनामार्फत राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही ही योजना राबविण्यात येईल, असे मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

रिलायन्स फाउंडेशन आणि महिला-बालविकास विभागामध्ये 2015 मध्ये झालेल्या सामंजस्य करारान्वये राज्यातील पुणे, ठाणे, पालघर, यवतमाळ, जळगाव, परभणी, उस्मानाबाद आणि वर्धा या 8 जिल्ह्यांमध्ये सुमारे 7 हजार 300 परसबागा तयार करण्यात आल्या आहेत. या बागांमध्ये पिकणारा भाजीपाला, फळे यांचा उपयोग सुमारे 1 लाख 65 हजारहून अधिक बालकांना पोषण आहारात होत आहे.

या सामंजस्य कराराची व्याप्ती आज 16 जिल्ह्यांपर्यंत वाढविण्यात आली. आता ही योजना बीड, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, गोंदीया, सोलापूर, नंदूरबार आणि चंद्रपूर या नवीन 8 जिल्ह्यांमध्येही राबविण्यात येईल. या एकूण 16 जिल्ह्यांमध्ये 25 हजारहून अधिक अंगणवाड्यांमध्ये परसबागा तयार करण्याचे उद्दीष्ट आज निर्धारीत करण्यात आले.
याचा लाभ साधारण 7 लाख 50 हजार विद्यार्थ्यांना होणार आहे. या योजनेसाठी रिलायन्स फाउंडेशन सीएसआरमधून सहकार्य करीत असून महिला – बालविकास विभागामार्फत तांत्रिक सहाय्य, प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, रिलायन्स फाउंडेशन आणि महिला-बालविकास विभाग यांच्यामार्फत अंगणवाड्यांमध्ये निर्माण करण्यात आलेल्या परसबागांच्या माध्यमातून बालकांना भाजीपाला, फळे मिळण्यास मदत होत आहे.

कुपोषण निर्मुलनाच्या दृष्टीने ही फार महत्वाची योजना आहे. महिला – बालविकास विभागामार्फत राज्यातील उर्वरीत जिल्ह्यांमध्येही ही योजना राबविण्यात येईल. शिवाय ग्रामीण भागात ज्या अंगणवाड्यांना परसबागांसाठी जागा नाही, त्यांना ग्रामपंचायतींमार्फत जागा उपलब्ध करुन देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी जाहीर केले.

यावेळी रिलायन्स फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ कुमार यांनीही मत व्यक्‍त केले. महिला -बालविकास विभागाच्या सचिव विनिता सिंगल आणि रिलायन्स फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ कुमार यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)