राज्यातल्या 65 हजार शाळा “डिजिटल’

गुणवत्ता वाढविण्यासाठी “ई-लर्निंग’चा उपक्रम

पुणे – राज्यातल्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी “ई-लर्निंग’चा उपक्रम राबवून “डिजिटल’ शाळा करण्यास शासनाकडून मोहिम सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत राज्यातील 65 हजार शाळा “डिजिटल’ बनल्या आहेत.

-Ads-

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने राज्यातल्या शाळांचा शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. 2015 पासून राज्यातल्या शाळा डिजिटल करण्याबाबतचे धोरण राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. राज्यात 1 लाख 6 हजार 527 प्राथमिक शाळा, तर 26 हजार 879 माध्यमिक शाळा आहेत. या सर्वच शाळा डिजिटल करण्यास सुरुवात झाली आहे. 2015-16 मध्ये 11 हजार 228, 2016-17 मध्ये 27 हजार 686, 2017-18 मध्ये 65 हजार याप्रमाणे शाळा डिजिटल झाल्या आहेत. याप्रमाणे दरवर्षी डिजिटल शाळांच्या संख्येत वाढ होत आहे.

विद्यार्थ्यांना “ई-लर्निंग’द्वारे शिक्षणाचे धडे देण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळखही करून देण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्याही वाढत आहे. विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास वाढत चालला असून आनंददायी अध्ययनही मिळत आहे. शाळांमधील तंत्रस्नेही शिक्षकांच्या सहाय्याने डिजिटल शाळांचे उपक्रम राबविण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासाविषयीची गोडीही वाढू लागली आहे. अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञानही विद्यार्थ्यांना देण्यात येऊ लागले आहे. या तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासाची सवय लागली असून विद्यार्थ्यांना शाळेबाबतचे आकर्षणही वाढू लागले आहे.
शिक्षक व लोकसहभागातूनच प्रामुख्याने शाळांमध्ये “ई-लर्निंग’चे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.

एल.सी.डी.प्रोजेक्‍टर, एल.सी.डी. स्क्रीन, संगणक आदी साहित्यांची शाळांमध्ये उपलब्धता करून देण्यात आली आहे. या साहित्यांचा वापर करून शाळा डिजिटल करण्यात येवू लागल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)