राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी अतिरिक्त साधन संपत्ती उभारणार – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती 

मुंबई – राज्य शासनाने अनेक पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे हाती घेतली असून या सर्व विकासकामांना गती देण्यासाठी अतिरिक्त साधन संपत्तीची उभारणी करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राज्याच्या अतिरिक्त साधनसंपत्ती उभारणीबाबत आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.

-Ads-

सिडको, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण, म्हाडा, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ, बांधकाम कल्याण कामगार मंडळ, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यासह इतर मंडळे, महामंडळे आणि प्राधिकरणाकडील अतिरिक्त निधी राज्य शासनाच्या कर्जरोख्यात गुंतवल्यास राज्य शासन, महामंडळे आणि मंडळे या दोघांनाही फायदा आहे. या निधीवर महामंडळे, मंडळे आणि प्राधिकरणाचाच अधिकार राहिल, त्यांना पाहिजे त्यावेळी त्यांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)