राज्याच्या प्रधान सचिवाकडून आळंदी नगरपरिषदेचे अभिनंदन

आळंदी- स्वच्छ सर्वेक्षणात आळंदी शहराने पश्‍चिम विभागात 98 वा क्रमांक प्राप्त केला आहे. स्वच्छ सर्वेक्षणाच्या मोबाईल ऍप डाऊनलोड, तक्रार निवारण, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता, हगणदारीमुक्‍ततेचा दर्जा टिकविणे आदी उपांगावर आपल्या शहराने केलेल्या भरीव कामगिरीमुळे आळंदी शहरास हा बहुमान प्राप्त केला आहे. दरम्यान, स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये महाराष्ट्र राज्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यामध्ये नगरपरिषदेने केलेले योगदान लाख मोलाचे असल्याचे राज्याच्या प्रधान सचिव मनिषा पाटणकर म्हैसकर यांनी एका पत्राद्वारे आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांना कळविले आहे. तसेच यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व अधिकारी, पदाधिकारी व आरोग्य विभाग तसेच ठेकेदार या सर्वांचे शासनाचे वतीने प्रयत्नातील सातत्य, सुक्ष्म नियोजन व स्वयंप्रेरणेने आपण व आपले शहर कचरा मुक्‍त शहराचे तारांकित मानांकन व आगामी स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये देखील अशीच उल्लेखनीय कामगिरी बजावून महाराष्ट्र राज्यास प्रथम क्रमांक मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजवावी, अशी अपेक्षा व्यक्‍त करून सर्वांचे अभिनंदन केले असल्याचे भूमकर यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)