राज्याचे हिवाळी अधिवेशन ११ डिसेंबरपासून

यंदाचे वादळी पावसाळी अधिवेशन काल संपले. पुढील हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये ११ डिसेंबर २०१७ पासून सुरू होणार आहे. विधान परिषदेतील सभापती रामराजे निंबाळकर यांनी ही घोषणा केली. पावसाळी अधिवेशन हे सत्ताधारी मंत्र्यांच्या भ्रष्टाचार आरोपांमुळे गाजले. यात प्रकाश मेहता आणि सुभाष देसाई यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर विरोधक शांत झालेत. तसेच शेतकरी कर्जमाफी, भायकळा तुरुंगात महिला कैद्याचा मृत्यू, लातूरमधील मुलीचे अपहरण करुन लग्न मुद्दा,  शेतकरी आत्महत्या प्रश्न आणि मराठा आरक्षणबाबत विरोधकांनी सरकारला धारेवल धरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)