राज्याचे नगर नियोजन खाते “भुक्कड’, होपलेस!

– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची टीका
– डेव्हलपमेंट प्लॅनसाठी “आऊटसोर्सिंग’चा सल्ला

प्रभात वृत्तसेवा
पुणे,  “टाऊन प्लॅनिंग’ अर्थात नगर नियोजन खाते “होपलेस’ असून, केवळ फुकटाला महाग आहे. काही कामाचे नाही. वीस-वीस वर्षे हे प्लॅन तयार करत नाहीत. अशी “भुक्कड’ ऑर्गनायझेशन मी आयुष्यात कुठेच पाहिली नाही. अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अखत्यारितील नगर नियोजन खात्यावर शाब्दिक बाण सोडला. इतकेच नाही, तर येत्या काळात पुण्याचे “व्हिजन’ तयार केले पाहिजे. त्यासाठी या टाऊन प्लॅनिंग विभागावर अवलंबून न राहता बाहेरच्या चांगल्या एजन्सीकडून पुण्याचा डेव्हलपमेंट प्लॅन तयार करून घ्या. त्याला मुख्यमंत्री लगेच परवानगी देतील, असा सल्लाही गडकरी यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)