वाकी- अण्णाभाऊ साठे फाऊंडेशन आणि वादन कला मंच यांच्या सयुंक्त विद्यमाने पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात राज्यस्तरीय हलगीवादन स्पर्धेत दोंदे (ता. खेड) येथील प्रसिद्ध हलगीसम्राट अंकुश कोंडीबा पाटोळे यांचा प्रथम क्रमांक आला आहे. पाटोळे यांचा प्रथम क्रमांक आल्याने या भागातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे त्याचे स्वरूप होते.
पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त वादन कला मंचच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत मोठ्या संख्येने हलगीवादकांनी भाग घेतला होता. त्यामध्ये खेड तालुक्‍यातील दोंदे येथील हलगीसम्राट अंकुश पाटोळे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. पुणे येथील सावित्रीबाई फुले स्मारकामध्ये आयोजित करण्यात आलेल्या बक्षीस वितरण समारंभात पाटोळे यांना अण्णाभाऊ साठे फाउंडेशनचे अध्यक्ष प्र.बा.सोनावणे, वादन कला मेळाव्याचे अध्यक्ष बाळासाहेब भांडे, कार्याध्यक्ष हनुमंतराव साठे, चंदन कांबळे आदींच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
पाटोळे यांचे केवळ पाचवीपर्यंत शिक्षण झाले असून, त्यांचे वडील कोंडीबा पाटोळे हे सूर आणि ताल वादक होते. त्यांना हे पारितोषिक मिळाल्या बद्दल सहाय्यक फौजदार दत्तात्रय जाधव, पोलीस हवालदार प्रमोद भोसले, महिला कार्यकर्त्या संगीता नाईकरे, वैशाली पानसरे, गुलाब पवार, गजानन गांडेकर आदींच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. पारंपारिक वाद्य असलेली ही जीवंत कला अखंडपणे टिकून राहण्यासाठी शासनाने या जीवंत कलेला मानधन दिले पाहिजे, अशी अपेक्षा अंकुश पाटोळे यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)