राज्यस्तरीय मिनी फुटबॉल स्पर्धा : महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांतून 400 खेळाडूंचा सहभाग

पुणे शहर संघांची विजयी सुरुवात
पुणे – पुणे शहराच्या संघांनी 14 आणि 17 वर्षांखालील मुलांच्या गटात आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करताना राज्यस्तरीय मिनी फुटबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली. पुणे जिल्हा मिनी फुटबॉल संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेतून गोवा येथे दि. 3 ते 5 ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे.

मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे कॉलेजच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेतील 14 वर्षांखालील मुलांच्या गटात पुणे शहर संघाने लातूर ग्रामीण संघावर 6-0ने मात केली. यात कृष्णा येनमालाने हॅटट्रिक नोंदवली, तर मिहिर विजयने दोन व अर्जुन जोशीने एक गोल करून त्याला चांगली साथ दिली. दुसऱ्या लढतीत मुंबई शहर संघाने लातूर जिल्हा संघावर 3-1ने मात केली.

यानंतर मुंबई शहर संघाने आपल्या दुसऱ्या लढतीत पुणे जिल्हा संघाला गोलशून्य बरोबरीत रोखले. तर पुढील लढतीत पीसीएमसी शहर संघाने नाशिक जिल्हा संघावर 1-0ने मात केली. यात पीसीएमसीकडून ताहा त्रिवेदीने तिसऱ्या मिनिटाला केलेला गोल निर्णायक ठरला. लातूर शहर संघाने सातारा शहर संघावर 5-0ने मात केली. यात लातूरकडून अमान शेखने दोन, तर पार्थ भंडारी, ओंकार पाटील व समीर शेख यांनी प्रत्येकी एक गोल केला.

स्पर्धेतील 17 वर्षांखालील मुलांच्या गटात पुणे शहर संघाने कोल्हापूर जिल्हा संघावर 2-1ने मात करून विजयी सलामी दिली. पुणे शहर संघाकडून साहिल कदम व पीयूष रोडीन यांनी गोल केले. दुसऱ्या लढतीत सातारा संघाने पीसीएमसी संघावर 4-0ने विजय मिळवला. सातारा संघाकडून आकाश जाधवने दोन, तर अभय पिसाळ व अथर्व छारकी यांनी प्रत्येकी एक गोल केला.

स्पर्धेच्या उद्‌घाटनप्रसंगी महसूल अधिकारी बजरंग मेकाले, माजी क्रीडा उपसंचालक जनक टेकाळे महाराष्ट्र मिनी फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष इक्रम खान, संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष इम्तीयाज पीरजादे, राष्ट्रीय पुरस्कार विजेते ताहेर आसी, महाराष्ट्र राज्य मिनी फुटबॉल असोसिएशनचे सचिव तकदीर सय्यद आदी उपस्थित होते.

सविस्तर निकाल – 14 वर्षांखालील मुले – 1) मुंबई शहर -3 (अल्तमश शेख तिसरे व चौथे मि., आयुश जयस्वाल पाचवे मि.) – लातूर – 1 (सहावे मि.) 2) मुंबई शहर – 0 बरोबरी वि. पुणे जिल्हा-0, 3)पीसीएमसी – 1 (ताहा त्रिवेदी तिसरे मि.) वि. वि. नाशिक जिल्हा -0, 4) लातूर शहर -5 (अमान शेख दुसरे व तिसरे मि., पार्थ भंडारी चौथे मि. ओंकार पाटील आठवे मि., समीर शेख नववे मि.) वि. वि. सातारा शहर – सातारा – 0 , 5) सोलापूर – 1 (आफन सैय्यद आठवे मि.) वि. वि. कोल्हापूर – 0. 6) पुणे शहर – 6 (कृष्णा येनमाला दुसरे, तिसरे व नववे मि., मिहिर विजय पाचवे व सातवे मि., अर्जुन जोशी आठवे मि.) वि. वि. लातूर ग्रामीण – 0, 7) पालघर – 4 (प्रीतराजसिंह दुसरे व सातवे मि., दर्शन कोन्हा पाचवे सहावे मि.) वि. वि. रत्नागिरी – 0, 8) सातारा – 0 बरोबरी वि. रत्नागिरी – 0, 17 वर्षांखालील मुले – 1) सातारा – 2 (आकाश जाधव चौथे मि., सिद्धेश बर्गे सातवे मि.) वि. वि. बीड – 0,2) नवी मुंबई – 0 बरोबरी वि. पीसीएमसी – 0, 3) बीड – 5 (अरबाज सय्यद चौथे व पाचवे मि., अदनान सहावे व आठवे मि., दानिश सोहेल सातवे मि.) वि. वि. पीसीएमसी – 0.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)