राज्यस्तरीय महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा; एमआयटी आळंदीची व्हीआयआयटीवर मात

पुणे – अनुराग यादव व आकाश सस्ते यांची दमदार फलंदाजी आणि सैफ अली व चंदन कुमार यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर एमआयटी आळंदी संघाने व्हीआयआयटी संघावर 48 धावांनी मात करताना राज्यस्तरीय महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली. ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

एआयएसएसएमएस सोसायटीच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या एमआयटी आळंदी संघाने निर्धारित 20 षटकांत 8 बाद 183 धावा फटकावल्या. अनुराग यादवने 51, तर आकाश सस्तेने 36 धावा केल्या. सैफ अलीने 21 धावा करताना त्यांना सुरेख साथ दिली. व्हीआयआयटीकडून देवेश ठाकूरने 2 बळी घेतले.

-Ads-

विजयासाठी 184 धावांच्या आव्हानासमोर व्हीआयआयटी संघाला 20 षटकांत 8 बाद 135 धावांचीच मजल मारता आली. सैफ अलीने 24 धावांत 2, तर चंदन कुमारने 25 धावांत 2 बळी घेत विजयात मोलाचा वाटा उचलला. व्हीआयआयटीकडून प्रथमेश नाचनकरने 61, तर साहिल उत्तरकरने 30 धावा करताना दिलेली कडवी झुंज अपुरी ठरली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)