राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत आर्या उचाळे तिसरी

टाकळी हाजी- मंथन पब्लिकेशन अहमदनगर आयोजित राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत टाकळी हाजी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवओहोळ या शाळेची तिसरी इयत्तेतील विद्यार्थीनी आर्या भाऊसाहेब उचाळे हीने 300 पैकी 292 गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत तृतीय क्रमांक मिळविला आहे. यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. मागील वर्षीही आर्या परीक्षेत पारगाव (ता. आंबेगाव) येथील परीक्षा केंद्रात प्रथम आलेली होती. दरवर्षी शाळेचे बहुसंख्य विद्यार्थी या परीक्षेस बसतात. शिष्यवृत्ती परीक्षेचा पाया म्हणून अनेक पालक आपल्या पाल्यांना या परीक्षेस बसवतात. शाळेची शंभर टक्के निकालाची परंपरा याही वर्षी टिकून आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका मंगल उचाळे यांनी मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब शेळके, केंद्रप्रमुख दत्तात्रय शिंदे, शिक्षक संघाच्या नेत्या रंजना खोमणे आणि गुरुकूल शिक्षक संघाच्या वतीने आर्याचे अभिनंदन करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)